आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीपी वर्ल्ड टूर, स्विसचा रॉजर फेडरर, केई निशिकोरीची विजयी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्विस किंग रॉजर फेडररने एटीपी वर्ल्ड टूर फायनलमध्ये सोमवारी शानदार विजयी सलामी दिली. त्याने यंदाच्या सत्रातील शेवटच्या टेनिस स्पर्धेतील किताबाच्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. फेडररने एकेरीच्या सलामी सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकला पराभूत केले. त्याने ६-१, ७-६ अशा फरकाने विजय मिळवला. तसेच त्याच्या बी गटातील जपानच्या केई निशिकोरीनेही सलामी सामना जिंकला.

सहा वेळचा चॅम्पियन फेडरर हा एटीपी फायनल्समध्ये विक्रमी १३ व्या वेळा सहभागी झाला आहे. त्याने दमदार सुरुवात करताना अवघ्या २५ मिनिटांत पहिल्या सेट आपल्या नावे केला. त्यानंतर मिलोसने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, फेडररने टायब्रेकरपर्यंत रंगलेला दुसरा सेट जिंकून सामन्यात विजय मिळवला. यासाठी त्याला मोठी झुंज द्यावी लागली. त्यानतर त्याने अडीच तासात सामना जिंकला.

डोडिंग-मेलो विजयी
दुहेरीच्या लढतीत इवान डोडिंग आणि मार्सेलो मेलो या सातव्या मानांकित जोडीनेही विजयी सलामी दिली. या जोडीने लढतीत नेस्टर व नेनाद जिमेंटिकला ६-३, ७-५ ने पराभूत केले. तसेच मार्सेल ग्रेनोलर्स आणि मार्क लोपेजने चौथ्या मानांकित ज्युलियन बेनूटियू व रॉजर वेस्लिनवर ६-४, ६-४ ने मात केली.

निशिकोरीची मरेवर मात
जपानचा युवा खेळाडू केई निशिकोरीने एकेरीच्या लढतीत इंग्लंडच्या अँडी मरेला धूळ चारली. त्याने ६-४, ६-४ अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला. या वेळी इंग्लंडच्या खेळाडूने दिलेली झुंज अपयशी ठरली.