आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉजर्स चषक टेनिस स्पर्धा: सेरेनाची आगेकूच, क्वितोवा बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरांटो - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे गतविजेत्या पेत्रा क्वितोवाला पराभवाचा सामना करावा लागला. अव्वल मानांकित सेरेनाने विजयी मोहीम अबाधित ठेवताना स्लोव्हाकियाच्या मॅगडेलेना रिबारिकोवावर मात केली. तिने 6-1, 6-1 ने सामना जिंकला. सहाव्या मानांकित क्वितोवाला रोमानियाच्या सोरान कर्स्टियाने पराभूत केले. तिने रंगतदार लढतीत 4-6, 7-5, 6-2 ने बाजी मारली. आशियातील एकमेव ग्रँडस्लॅम विजेती ली नाने महिला एकेरीच्या अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. तिने स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोवाला 7-6, 6-2 ने पराभूत केले.