आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohan Bopanna, Aisam Qureshi Advance To Quarters Of Monte Carlo

मोंटे-कार्लो मास्टर्स टेनिस : रोहन बोपन्ना-ऐसाम कुरेशी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोंटे कालरे - भारताच्या रोहन बोपन्नाने पाकचा सहकारी ऐसाम कुरेशीसोबत विजयी मोहीम अबाधित ठेवताना एटीपी मोंटे-कार्लो रोलेक्स मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जोडीने लढतीत सातवा मानांकित लुकास कुबोट आणि रॉबर्ट लिंडस्टेडतचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. बिगरमानांकित बोपन्ना-कुरेशीने 6-3, 6-0 अशा फरकाने सामना जिंकला. यासह या जोडीने 54 मिनिटांत पुरुष दुहेरीच्या अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला. आता या जोडीचा उपांत्यपूर्व सामना क्रोएशियाच्या इवान डोंडिंग-मार्सेलो मेलोशी होईल.

नदाल, वावरिंका अंतिम आठमध्ये
राफेल नदाल व स्टॅनिलास वावरिंकाने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. नदालने इटलीच्या आंद्रे सेप्पीवर 6-1, 6-3 ने विजय मिळवला. तसेच स्पेनचा निकोलसने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे वावरिंकाला पुढील फेरीत प्रवेश देण्यात आला.