आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहन बोपन्नाची टॉप-10मध्ये धडक ; पेसचीही प्रगती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा रोहन बोपन्नाने क्रमवारीत टॉप-10मध्ये धडक मारली. त्याला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीची उपांत्य फेरी गाठण्याचा फायदा झाला. त्याने पाच स्थानांची सुधारणा केली. बोपन्नासह लिएंडर पेस, महेश भूपती आणि सोमदेव देववर्मनने क्रमवारीत सुधारणा केली. मात्र, सानिया मिर्झाची क्रमवारीत घसरण झाली.
बोपन्ना व एडवर्ड रॉजर वेसेलिन जोडीला जगातील नंबर वन बॉब व माइक ब्रायनने पराभूत केले. या पराभवानंतरही बोपन्नाने दहावरून पाचवे स्थान गाठले.


पेसचे टॉप-10मध्ये पुनरागमन :
बोपन्नाच्या नावे आता 5380 गुण झाले आहेत. पेस आणि चेक गणराज्यचा एस.स्तेपानेक या जोडीने उपांत्य लढतीत क्रोएशियाच्या इवान डोडिंग व ब्राझीलच्या मार्सेलो मेलोविरुद्ध लढतीत पराभव पत्कारला. मात्र, या लढतीतील कामगिरीचा पेसला फायदा झाला. त्याने पुन्हा अव्वल दहामध्ये पुनरागमन केले. त्याने 4720 गुणांसह क्रमवारीत नववे स्थान पटकावले.
भूपतीच्या क्रमवारीत सुधारणा : भूपतीने क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा केली. तो आता 5225 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. सोमदेव देववर्मनला क्रमवारीत पाच स्थानांचा फायदा झाला. तो 441 गुणांसह 131 व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीच्या क्रमवारीत सानिया मिर्झाची 19 व्या स्थानी घसरण झाली. यापूर्वी, ती 15 व्या स्थानावर होती.
फेडररची घसरण : ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा किंग रॉजर फेडररची क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतका मागे पडला आहे.
टॉप-5 (पुरुष आणि महिला एकेरीची क्रमवारी)
पुरुष
1. नोवाक योकोविक (12,310 गुण)
2. अ‍ॅँडी मुरे (9360)
3. डेव्हिड फेरर (7220)
4. राफेल नदाल (6860)
5. रॉजर फेडरर (5785)
महिला
1. सेरेना विल्यम्स (11895 गुण)
2. मारिया शारापोवा (9235)
3. व्हिक्टोरिया अजारेंका (8825)
4. एग्निजस्का रांदावास्का (5965)
5. ली ना (5555)