आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Rohit Sharma Abused Fans Before ODI Record

केवळ एका चुकीने केले होते \'बॅड बॉय\', आता रोहित झालाय रेकॉर्डकिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रोहित शर्मा)
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा याने कोलकताच्या ईडन गार्डनवर 264 धावांचा वर्षाव केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एवढी मोठी इनिंग कुणीच खेळलेली नाही. एवढेच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतके मारणारा तो एकमेव फलंदाज झाला आहे. रोहितचा रेकॉर्ड जागतीक दर्जाचा आहे. पण त्याची आताच सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत तुलना करणे योग्य नाही.
सचिन तेंडुलकरने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले. पण मैदानाच्या बाहेर अभद्र व्यवहार केल्याची त्याच्याकडून एकही घटना घडलेली नाही. रोहित शर्मा 2012 मध्ये ऑस्ट्रेलिया टूरवर असताना वादात सापडला होता.
फॅनला केली शिविगाळ
रोहितने विदेशातील टूरवर असताना भारतीय फॅनला शिविगाळ केली होती. ही घटना 2012 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया दूरदरम्यान घडली होती. रोहित शर्मा आणि प्रविणकुमार गब्बा मैदानावर सराव करीत होते. यावेळी काही भारतीय फॅन्स त्यांना बघायला आले होते. यावेळी टीमच्या वाईट खेळावर फॅन्सनी टिकाटिप्पणी केली. त्यावर रोहित भडकला. त्याने एका फॅनला शिविगाळ केली. यावेळी प्रविणकुमारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण जरा वेळाने त्यानेही शिविगाळ सुरु केली.
पुढील स्लाईडवर वाचा, रोहित शर्मा याच्याशी निगडित विवाद... काही खासगी बाबी...