आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Sharma Hits Double Hundred Against Australia

रोहित शर्मा क्रिकेटचा क्रिश 3: 16 षटकारांचा विक्रम, वन डेमध्‍ये तिसरे द्विशतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू । नरक चतुर्दशीला फटाके नव्हे तर रोहित शर्माच्या फटकेबाजीचा दणदणाट दुमदुमला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 षटकारांसह 209 धावा फटकावत रोहितने विश्वविक्रमांची आतषबाजी केली. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 57 धावांनी विजय मिळवत मालिकाही जिंकली. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा रोहित तिसराच खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवागने ही किमया केली होती. मालिकेत एकूण 491 धावा चोपणारा रोहित सामनावीर व मालिकावीर ठरला.

भारतीय क्रिकेटचा नवा सुपरहीरो
हृतिक रोशनचा ‘क्रिश 3’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. दुस-याच दिवशी बंगळुरूत क्रिकेट जगतातील या ‘क्रिश 3’ने मैदान मारले. रोहित शर्मा क्रिकेटचा तिसरा सुपरमॅन ठरला. चौकार, षटकारांच्या आतषबाजीत प्रेक्षकांचीही दिवाळी झाली!

कांगारूंची शेवटच्या क्षणापर्यंत झुंज
भारताने उभ्या केलेल्या धावांच्या डोंगरापुढे कांगारूंनीही शर्थीची झुंज दिली. जेम्स फ्युकनरने 73 चेंडूंत 6 षटकार व 11 चौकारांनिशी 116 धावा करत शेवटपर्यंत किल्ला लढवला. मॅक्सवेलनेही 22 चेंडूंत 7 षटकारांसह 60 धावांची तुफानी खेळी केली. शमी व जडेजाने प्रत्येकी 3 बळी टिपले.

रोहित शर्मा

209धावा
16 षटकार
12 चौकार
158 चेंडू

वनडेतील द्विशतकवीर सचिन, सेहवागसोबत बेलिंडाही
सचिन, सेहवाग आणि रोहितच्या आधी वनडेत द्विशतक ठोकण्याचे रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कच्या नावे आहे. तिने ही कामगिरी 1997 मध्ये केली.