आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Sharma Played 100 One Day Matches Without Playing In Test Cricket

रोहितने केला आगळावेगळा विक्रम, कसोटीशिवाय ठोकले वनडेत ‘शतक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबईचा क्रिकेटपटू रोहित शर्मा कसोटीशिवाय 100 आंतरराष्ट्रीय वन डे खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध दुस-या सामन्यात मैदानावर उतरताच रोहितच्या नावे शंभर वनडे जमा झाले.
या सामन्यात तो एका धावेवर बाद झाला.

रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध वनडे पर्दापण केले होते. शंभर वनडेत त्याने 31.79 च्या सरासरीने 2480 धावा काढल्या आहेत. यात दोन शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितला 2010 मध्ये कसोटी संघात संधी मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने त्याला दुखापतीमुळे कसोटीत पदार्पण करता आले नाही. अद्याप तो ‘कसोटी’ च्या प्रतीक्षेत आहे.

रैनाचा विक्रम मोडीत : 26 वर्षीय रोहित शर्मापूर्वी, कसोटीशिवाय सर्वाधिक वन डे खेळण्याचा विक्रम भारताच्या सुरेश रैनाच्या नावे होता. कसोटीत न खेळता त्याने 98 वन डे खेळले आहेत. रवींद्र जडेजा 58, दिनेश मोंगिया 57, इंग्लंडचा विक्रम सोळंकीला 51 वनडेनंतर कसोटीत संधी मिळाली.