आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत झळकले चार दुहेरी शतके, रेकॉर्ड करणारे सगळे भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकत्यातील प्रसिद्ध ईडन गार्डन्सवर काल क्रिकेट जगातील ऐतिहासिक घटना घडली. टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा याने धुवांधार 264 धावा झळकावल्या. या सामन्यात भारताने श्रीलंकेला तब्बल 153 धावांनी धुळ चारली. गेल्या पाच वर्षांत एकदिवसीय सामन्यात चार वेळा दुहेरी शतक करण्याचे रेकॉर्ड झाले आणि तसेच तुटलेही. विशेष म्हणजे हे सर्व रेकॉर्ड भारतील फलंदाजांनी केले आणि तोडले.
पहिल्यांदा हा कमाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये केला. ग्लाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिनने 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने हा रेकॉर्ड 2011 मध्ये मोडला. त्याने इंदुरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावा झळकावल्या होत्या. त्यावर 2013 मध्ये रोहित शर्माने मात केली. बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 209 धावा रचल्या होत्या. आता रोहितने आपलाच रेकॉर्ड तोडला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 264 धावा केल्या. यासह एकदिवसीय सामन्यात एकाच खेळीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
साल खिलाड़ी देश रन
2010 सचिन तेंडुलकर सा अफ्रीका 200*
2011 वीरेंद्र सहवाग वेस्टइंडीज 219
2013 रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया 209
2014 रोहित शर्मा श्रीलंका 264
केवळ 4 धावांवर बाद झाला असता रोहित
श्रीलंकेचा शमिंडा एरांगा याने कॅच सोडला नसता तर रोहित शर्मा केवळ 4 धावांवर बाद झाला असता. पण रोहित सुदैवी ठरला. सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये रोहितने हा धोकादायक शॉट खेळला होता. यावेळी चेंडू सरळ एरांगा याच्या हातात गेला होता. पण तो कॅच घेऊ शकला नाही. यामुळे रोहितला दुहेरी शतक करण्याची सुवर्णसंधी मिळाली. रोहितने अगदी धुवांधार दुहेरी शतक केले. 200 पासून 250 धावांचा टप्पा गाठताना रोहितने केवळ 15 चेंडू घेतले.
अशा प्रकारे रोहित शर्माने धावा केल्या
50 धावा- 72 वा चेंडू
100 धावा - 100 वा चेंडू (28 चेंडू)
150 धावा - 125 वा चेंडू (25 चेंडू)
200 धावा - 151 वा चेंडू (26 चेंडू)
250 धावा - 166 वा चेंडू (15 चेंडू)

श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात रोहितने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. बोटांना दुखापत झाल्याने रोहित सक्रीय क्रिकेटपासून काहीसा दूरच होता. परंतु, त्याने ईडन गार्डन्समध्ये तुफान फलंदाजी करुन त्याच्यातील क्षमता सिद्ध केली आहे. त्याने केवळ 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकार मारत 264 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 152.60 होता.
रोहितने केलेले जागतीक विक्रया या प्रमाणे आहेत-
264 धावा - सर्वांत मोठी वनडे खेळी
33 - एका खेळीत सर्वांधिक चौकार
2 - दोनवेळा डबल सेंच्युरी लावणारा एकमेव फलंदाज
4 - रोहित केवळ चार धावांनी जागतीक रेकॉर्ड तोडण्यापासून दूर राहिला. सर्वाधिक वैयक्तिक स्कोअरचा रेकॉर्ड इंग्लंडचा एलिस्टर ब्राऊनच्या नावावर आहे. त्याने 19 जून 2002 रोजी ओव्हल मैदानावर 268 धावा केल्या होत्या.
पुढील स्लाईडवर बघा, दुहेरी शतक झळकावताना रोहित शर्माने आपल्या भावनांना कशी वाट मोकळी करुन दिली...