आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Sharma Smashed Hundred Against Afghanistan

122 चेंडू, 150 धावा, 12 चौकार, 7 उत्‍तुंग षटकार... अॅडिलेडमध्‍ये चमकला रो'हिट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने विश्‍वचषकातील दुस-या सराव सामन्‍यात अफगानिस्‍तानच्‍या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कित्‍येक दिवसांनंतर रोहित शर्माला आज सुर गवसला. त्‍याने अफगाणिस्‍तानच्‍या गोलंदाजांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्‍याने 122 चेडूंचा सामना करताना 150 धावांची दमदार खेळी केली. त्‍यात 12 चौकार तर 7 उत्‍तुंग षटकारांचा समावेश आहे.
( फोटो - अफगानिस्तानविरुध्‍द शॉट खेळताना रोहित शर्मा)
ऑस्ट्रेलिया विरुध्‍द लगावले होते शानदार शतक
तंदुरुस्‍त नसल्‍यामुळे रोहित शर्मा भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या तिरंगी लढतीत केवळ एक सामना खेळू शकला. त्‍या एकमेव सामन्‍यात त्‍याने 138 धावा केल्‍या होत्‍या.
अजिंक्य रहाणेही आला लयीत
रोहितशिवाय अजिंक्य रहाणेनेही चांगली फलंदाजी केली. त्‍याने 61 चेंडूत नाबाद 88 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये 12 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
रैना ' बरसे'
अफगानिस्तान विरुध्‍द सुरेश रैनाने चांगलया फलंदाजीचे प्रदर्शन केले. 71 चेंडूमध्‍ये 75 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.
फेल ठरले धवन, विराट आणि धोनी
ऑस्ट्रेलियाविरुध्‍द पहिल्‍या वार्म अप सामन्‍यात अर्धशतक झळकावणारा धवन या सामन्‍यात फेल ठरला. शिखर धवन 4, कर्णधार धोनी 10 आणि विराट कोहली 5 धावांवर बाद झाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा,मॅचदरम्यानची निवडक छायाचित्रे...