आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच सामन्यात रोहितसोबत झाले असे काही, आठवणीनेही जाते मान खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलनंतर रोहित शर्माने आपल्‍या नेतृत्‍वाखाली मुंबई इंडियन्‍सला चॅम्पियन्‍स लीगचे जेतेपद मिळवून दिले आहे. आपल्‍यामध्‍ये लीडरशीपचे सर्व गुण असल्‍याचे त्‍याने यातून दाखवून दिले आहे. एका मध्‍यमवर्गीय कुटुं‍बातून येऊन क्रिकेटस्‍टार बनण्‍याचा रोहितचा प्रवास खूपच रोमांचक असा आहे.

रोहितच शाळेत असताना त्‍याच्‍यावर मुंबईच्‍या प्रसिद्ध स्‍वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्‍कूलचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची नजर पडली. रोहितचे क्रिकेट खेळण्‍याचे तंत्र जबरदस्‍त असल्‍याचे लाड यांच्‍या नजरेने जाणले. परंतु, अशा मोठया शाळेत प्रवेश घ्‍यावा इतकी त्‍याच्‍या मध्‍यमवर्गीय आई-वडीलांची परिस्थिती नव्‍हती.

रोहितचे वडील गुरूनाथ शर्मा ट्रान्‍सपोर्ट कंपनीत नोकरी करीत असत. नंतर तीही नोकरी सुटली. त्‍यामुळे त्‍यांनी लाड यांना सरळसरळ नकार दिला. परंतु, नशीबात काही वेगळेच लिहिले होते. शाळेत प्रवेश घेण्‍याचा अडसर दूर झाला. विशेष म्‍हणजे त्‍याला तिथे स्‍कॉलरशिपही मिळाली.

कालांतराने त्‍याने आपल्‍या खेळाच्‍या जोरावर 2007मध्‍ये आर्यलंडमध्‍ये जाणा-या टीम इंडियामध्‍ये स्‍थान मिळवले. रोहितने कुटुंबियांच्‍या अपेक्षांची पुर्तता केली. रोहितसाठी आपले कुटूंबच सर्व काही आहे.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही त्‍याच्‍या पालकांनी कुठलीच कमतरता भासू दिली नाही. तो कायम जमिनीवर असतो. यशाची हवा त्‍याने आपल्‍या डोक्‍यात घातलेली नाही. त्‍यामुळेच वाईट परिस्थितीतूनही बाहेर येण्‍यात तो यशस्‍वी ठरला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या रोहितच्‍या पर्सनल आणि स्‍पोर्ट्स लाईफबद्दल...