Home | Sports | From The Field | rohit sharma wants to cement his place in team india

भारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी फलंदाजी करतच राहणार

agency | Update - Jun 07, 2011, 03:17 PM IST

वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्माने आपले पहिले ध्येय भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचे आहे, असे म्हटले आहे.

  • rohit sharma wants to cement his place in team india

    पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या रोहित शर्माने आपले पहिले ध्येय भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचे आहे, असे म्हटले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याने मी दुःखी होतो. मात्र, आता भारताचे विश्वविजेतेपद कायम ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करीत राहणार असल्याचे रोहितचे म्हणणे आहे.

    रोहित शर्मा सोमवारी क्विन्स पार्क येथे झालेल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी केली. या कामगिरीबद्दल रोहितला सामन्याचा मानकरी म्हणून घोषीत करण्यात आले. रोहित म्हणाला, मला विश्वकरंडकात खेळण्याची संधी न मिळणे, हे मला विसरून पुढे पाहिले पाहिजे. मी संघात आपली जागा बनविण्यासाठी प्रय़त्न करीत आहे. गेल्या तीन महिन्यात मी तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली असून, मला आता कोणतीही दुखापत नाही.

Trending