आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपनची बक्षीस रक्कम आता 2.87 कोटी डॉलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली. आता ही बक्षिसाची रक्कम 2.87 कोटी डॉलर (1 अब्ज 56 कोटींपेक्षा अधिक) पर्यंत पोहोचली आहे. पुरुष व महिला एकेरीतील विजेत्यांना 15 लाख युरो इतके (10.68 कोटी) बक्षीस मिळेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम अडीच लाख युरो (1.78 कोटी) रुपयांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती फ्रेंच ओपन आयोजकांनी दिली.

आगामी 2016 पर्यंत ही बक्षिसाची रक्कम 3.2 कोटी युरो करण्याची योजना असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुसरीकडे यूएस ओपनच्या बक्षिसांची रक्कम या वर्षी 3.3 कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ही रक्कम 2017 पर्यंत पाच कोटी डॉलर करण्याची योजना आहे. 2012 पर्यंत विम्बल्डनमध्ये बक्षीस रक्कम 2.4 कोटी रुपये होती. तसेच आॅस्ट्रेलियन ओपनच्या बक्षिसांची रक्कम या वर्षी 3.1 कोटी डॉलर होती.