आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोनाल्डोच श्रीमंत फुटबॉलपटू; इंग्लंडच्या बेकहॅमला टाकले मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पोतरुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो कमाईच्या शर्यतीत (वर्षाला 122 मिलियन पाउंड इतकी कमाई, जवळपास 1247.34 कोटी रुपये) नंबर वन बनला आहे. याबाबत त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमला मागे टाकले आहे. सर्वाधिक कमाई करणार्‍या फुटबॉलपटूंच्या यादीत मागच्या वर्षी बेकहॅमने 165 मिलियन पाउंडांसह अव्वलस्थान मिळवले होते. येथेसुद्धा त्याला त्याचा धुरंधर प्रतिस्पर्धी लियोनेल मेसीकडून स्पर्धा मिळत आहे. बार्सिलोनाचा मेसी दुसर्‍या, सॅम्युअल इटो तिसर्‍या स्थानावर आहेत.

वायने रुनीही शर्यतीत
डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, या यादीत वायने रुनी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची कमाई 69 मिलियन पाउंड इतकी आहे. रुनीने नुकताच मँचेस्टर युनायटेडसोबत प्रत्येक आठवड्यासाठी 3 लाख पाउंड इतक्या रकमेचा करार केला आहे. याशिवाय 1.8 मिलियन पाउंड रकमेचा त्याने आणखी एक व्यावसायिक करार केला आहे.

>अव्वलस्थानी पोहोचणे हे मानसिक समाधान आहे. त्याला न भुलता पुढील सामन्याचा विचार करणे हेच लक्ष्य असते. - कालरे अँनसेलोट्टी, माद्रिदचे प्रशिक्षक.

रोनाल्डोने नुकताच नाइकेसोबत एक नवा करार केला आहे. मागच्या सत्रात त्याने रिअल माद्रिदसोबत 76 मिलियन पाउंड रकमेचा करार केला होता. फुटबॉलच्या दुनियेत कोणत्याही खेळाडूला मिळणारी ही सर्वाधिक रक्कम ठरली.

चेल्सीचा इटो तिसरा
कमाईच्या या यादीत चेल्सीचा सॅम्युअल्स इटो 70 मिलियन पाउंड रकमेसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसे पाहिले तर रोनाल्डो आणि मेसीच्या तुलनेत इटोची कमाई कमी आहे. या दोघांना मागे टाकणे सध्या तरी सॅम्युअल्ससाठी सोपे नाही. तो चेल्सीचा सर्वाधिक र्शीमंत खेळाडू मात्र निश्चितपणे आहे.

मेसीसुद्धा शर्यतीत
बार्सिलोनाचा स्टार लियोनेल मेसी र्शीमंत फुटबॉलपटूंच्या यादीत सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याची कमाई 120.5 मिलियन पाउंड म्हणजे जवळपास 1226.90 कोटी रुपये इतकी आहे. कमाईबाबत रोनाल्डोपेक्षा तो थोड्यानेच मागे आहे. मेसी आणि रोनाल्डो आपल्या संघांच्या सामन्यात नेहमी चर्चेत असतात. 29 वर्षीय रोनाल्डो माद्रिदकडून खेळतो तर मेसी बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करतो.


ला लीग : रिअल माद्रिद अव्वलस्थानी
माद्रिद- सेंटियागो बर्नेब्यू येथे झालेल्या ला लिगाच्या सामन्यात रिअल माद्रिदने लिव्हांटेवर 3-0 अशी मात करीत पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. रिअल माद्रिदचा क्रिस्टियानो रोनाल्डोने 11 व्या मिनिटाला गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोचा हा सत्रातील 38 वा गोल ठरला. रोनाल्डोला रोखण्याच्या प्रयत्नात धसमुसळा खेळ केल्याबद्दल लिव्हांटेच्या डेव्हिड नॅवेरोला लाल कार्ड दाखवण्यात आले. अवघ्या 10 खेळाडूंशी खेळणार्‍या लिव्हांटेला कोंडीत पकडत रिअल माद्रिदने अजून दोन गोल लगावत सामना 3 -0 अशा फरकाने खिशात घातला.
अँटलेटिको माद्रिदला टाकले मागे : या विजयामुळे रिअल माद्रिदने अँटलेटिको माद्रिदला तीन गुणांनी पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.