आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार रोनाल्डिन्होचे ब्राझील फुटबॉल संघात पुनरागमन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दी जानेरिओ- दोन वेळेसचा फिफा प्लेअर ऑफ द इयर ठरलेला फुटबॉलपटू रोनाल्डिन्होला पुढच्या आठवड्यात चिलीविरुद्ध होणा-या मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीसाठी ब्राझील संघात सामील करण्यात आले आहे. न्यूज एजन्सी सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्यात बोल्व्हियाविरुद्ध मिळालेल्या 4-0 अशा शानदार विजयात प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याला संघात पुन्हा स्थान मिळाले. रोनाल्डिन्होला इटली आणि रशियाविरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत संघात स्थान मिळाले नव्हते.

ब्राझीलचे कोच लुइज फिलिफ स्कॉलरीने म्हटले, आम्ही बोल्व्हियाविरुद्ध अपेक्षेपेक्षा चांगला खेळ केला. आता आमची टीम चिलीविरुद्धसुद्धा चांगली कामगिरी करील, अशी आशा आहे. कोचला आणि निवड समितीचे लक्ष खेचण्यासाठी खेळाडूंसाठी चिलीचा सामना शेवटची संधी असेल. यानंतर जून महिन्यात होणा-या कंफेडरेशन चषकासाठी ब्राझील टीमची निवड होईल.

एक नजर रोनाल्डिन्होवर

1. फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर : 2004, 2005.
2. फिफा कंफेडरेशन कप गोल्डन बॉल आणि गोल्डन शूज अवॉर्ड : 1999
3. ब्राझीलच्या राष्‍ट्रीय टीमसाठी कामगिरी : 96 सामन्यांत 33 गोल
4. क्लब फुटबॉलमध्ये कामगिरी : 393 सामन्यांत 152 गोल.