आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ronaldo's Double Chance: Victory Over The Real Madrid

रोनाल्डोचा डबल धमाका; रियल माद्रिदवर विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - घरच्या मैदानावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना रियल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये गेटाफे सीएफचा पराभव केला. यजमान संघाने 4-1 अशा फरकाने सामना जिंकला.


क्रिस्टियानो रोनाल्डोने (33, 90 मि.) केलेल्या गोलच्या बळावर माद्रिदने विजय मिळवला. पेपे (19 मि.) आणि इस्को (59 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले. महागडा फुटबॉलपटू गॅरेथ बेलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याचा फायदा घेत पाहुण्या टीमने दमदार सुरुवात करताना पाच मिनिटांत 1-0 ने आघाडी घेतली. अ‍ॅँजेल लफिताने गेटाफेकडून पहिला मैदानी गोल केला. मात्र, या संघाला ही आघाडी फार काळ कायम ठेवता आली नाही. त्यानंतर 14 मिनिटांत रियल माद्रिदने सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली. पेपेने 19 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर रोनाल्डोने संघाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्याने 33 व्या मिनिटाला पेनॉल्टी कार्नरवर गोल केला. लढतीत 59 व्या मिनिटाला इस्कोने वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा मैदानी गोल केला.
4-1
ने माद्रिद विजयी
02
गोल केले रोनाल्डोने.
गेटाफे सीएफला एकच गोल करता आला .
व्हॅलेंसियाची सेव्हिलावर मात
दुसरीकडे व्हॅलेंसिया सीएफने स्पॅनिश लीगमध्ये 3-1 ने सामना जिंकला. या फुटबॉल क्लबने सामन्यात सेव्हिला एफसीचा पराभव केला. जोन्स (32, 73 मि.) आणि व्हिक्टर रुइझ (82 मि.) यांनी संघाला विजय मिळवून दिला. सेव्हिला फुटबॉल क्लबकडून गॅमेइरोने 51 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.