आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉस टेलरच्या शतकामुळे न्यूझीलंडच्या 307 धावा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - पहिल्या कसोटीत तडाखेबाज द्विशतक ठोकणारा न्यूझीलंडचा रॉस टेलर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात परत एकदा शतकी खेळी साकारून त्याने चुणूक दाखवली आहे. टेलरच्या 129 धावांच्या दमदार खेळीच्या भरवशावर न्यूझीलंडने पहिल्या डावाच्या पहिल्याच दिवशी 6 बाद 307 धावा काढल्या.
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफे क जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोलंदाज डॅरेन सॅमीने सलामीवीर फुल्टोनला रामदीनकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला फक्त 14 धावांवरच पहिला झटका दिला. त्यानंतर बेस्टने दुसरा सलामीवीर रुदरफोर्डला 11 धावांवरच रोखत न्यूझीलंडला अडचणीत आणले. मात्र, त्यानंतर फलंदाजीस आलेला केन विल्यम्सन आणि रॉस टेलरने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना जास्त संधी दिल्या नाहीत. दोघांनीही 88 धावांची भागीदारी केली. दरम्यान, विल्यम्सनला 45 धावांवर बेस्टने बाद केले. तत्पूर्वी, रुदरफोर्डच्या जागी फलंदाजीस उतरलेल्या ब्रँडेन मॅक्युलमला सोबत घेऊन टेलरने चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली आणि सोबत या मालिकेतील सलग दुसरे शतकही पूर्ण केले. 129 धावांच्या खेळीत त्याने 227 चेंडंूचा सामना करत 15 चौकारही लगावले. मॅक्युलमने 37 धावांचे योगदान दिले.
गोलंदाजी समाधानकारक
वेलिंग्टनच्या उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली संधी असतानाही विंडीजचे गोलंदाज मात्र फारशी चमक दाखवू शकले नाहीत; पण प्रमुख गोलंदाजांनी केलेल्या थोड्याफार प्रभावी मा-यापुढे न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. टिनो बेस्टने न्यूझीलंडचे 2 गडी बाद केले असले, तरी अन्य बाजूने तितकी प्रभावी कामगिरी दिसली नाही. गॅब्रिएल, डॅरेन सॅमी, शिलिंगफोर्ड आणि देवनारायण यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
रॉस टेलरच्या 4 हजार धावा पूर्ण
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन डावांत न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज रॉस टेलरने 362 धावा काढल्या आहेत. यात एक द्विशतक, तर एका शतकाचा समावेश आहे. या उत्कृष्ट कामगिरीसोबतच त्याने कसोटी कारकीर्दीतील त्याच्या 4 हजार धावाही पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची धावांची सरासरी 46.52 इतकी होती.