आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL: रॉस टेलर, आशिष नेहराची संघ अदलाबदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोठया गाजावाजात 'आयपीएल सहा'च्‍या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव झाल्‍यानंतर, आता काही संघांनी परस्‍पर बदल करण्‍यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात पुणे वॉरियर्स आणि दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स यांच्‍यापासून झाली आहे. तीन एप्रिल ते 26 मे या कालावधीत होणार्‍या ‘आयपीएल सहा’ या स्पर्धेसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉस टेलरच्या बदल्यात पुणे वॉरियर्सच्या आशिष नेहराला घेतले आहे.

रॉस टेलरची पुणे वॉरियर्स ही चौथी आयपीएल टीम आहे. या आधी त्याने रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. आशिष नेहराने यापूर्वी 2009 व 2010 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे तसेच मुंबई इंडियन्‍सचेही प्रतिनिधित्व केले होते.