बंगळुरू - स्फाेटक फलंदाज क्रिस गेल (२१), विराट काेहली (३४) अाणि सामनावीर मनदीप सिंगच्या नाबाद ४५ धावांच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स संघाने अाठव्या सत्राच्या अायपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी राॅयल विजय मिळवला. यजमान बंगळुरूच्या संघाने घरच्या मैदानावर गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्सवर ७ गडी राखून मात केली. यासह बंगळुरू संघाने यंदाच्या सत्रात चाैथ्या विजयाची अापल्या नावे नाेंद केली. दुसरीकडे गतविजेत्या काेलकात्याच्या टीमला चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. या वेळी काेलकात्याच्या अांद्रे रसेलची (४५) एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्स काेलकाता संघाने दहा षटकांमध्ये ४ गडी गमावून १११ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९.४ षटकांत लक्ष्य गाठले. मनदीपने तुफानी खेळी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला.
अावाक्यातल्या अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरू संघाची क्रिस गेल व विराट काेहलीने दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने काेलकात्याच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत संघाला ४८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यात क्रिस गेलने २१ अाणि काेहलीने ३४ धावांचे याेगदान दिले.
मनदीप चमकला
फाॅर्मात असलेल्या मनदीपला डेव्हिड विसची साथ मिळाली. या दाेघांनी चाैथ्या गड्यासाठी केलेल्या ३४ धावांच्या भागीदारीच्या बळावर बंगळुरूने सामना जिंकला. मनदीपने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावा काढल्या. िवसने सात चेंडूंत नाबाद ९ धावांचे याेगदान दिले.
पावसामुळे सामना दहा षटकांचा
मुसळधार पावसामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा सामना प्रत्येकी १० षटकांचा खेळवण्यात अाला.
धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६
उथप्पा झे. कार्तिक गो. चाहल २३ २१ ३ ०
गंभीर झे. मनदीप गो. विस १२ ०८ २ ०
आंद्रे रसेल धावबाद ४५ १७ ५ ३
डोशकाटह झे. डिव्हिलर्स गो. स्टार्क १२ ०७ १ १
युसूफ पठाण नाबाद ११ ०६ ० १
सूर्यकुमार यादव नाबाद ०० ०२ ० ०
अवांतर : ८. एकूण : १० षटकांत ४ बाद १११ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-३३, २-७१, ३-९६, ४-१०२. गोलंदाजी : स्टार्क २-०-१५-१, वरुण अॅरोन २-०-२९-०, हर्षल पटेल २-०-२२-०, वीस २-०-२०-१, चाहल २-०-२२-१.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६
गेल झे. रसेल गो. हॉग २१ ०९ ० ३
कोहली झे. सुर्यकुमार गो. रसेल ३४ २० २ ३
डिव्हिलर्स त्रि. गो. चावला ०२ ०४ ० ०
मनदीप सिंग नाबाद ४५ १८ ४ ३
डेव्हिड विस नाबाद ०९ ०७ ० ०
अवांतर : ४. एकूण : ९.४ षटकांत ३ बाद ११५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४८, २-५१, ३-८१. गोलंदाजी : कमिन्स २-०-१८-०, उमेश यादव २-०-३१-०, ब्रॅड हॉग २-०-२३-१, पीयूष चावला २-०-२१-१, आंद्रे रसेल १.४-०-२२-१.