आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Challengers Bangalore V Rajasthan Royals At Bangalor

राजस्थान राॅयल्स-बंगळुरूचा सामना पाण्यात! दाेन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - अायपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी राजस्थान राॅयल्स व काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. त्यामुळे दाेन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात अाला. एका गुणासह बंगळुरूने तिसऱ्या स्थानावर धडक मारली. केकेअारची चाैथ्या स्थानी घसरण झाली. राजस्थान दुसऱ्या स्थानावर कायम अाहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २०० धावा काढल्या हाेत्या.

सरफराजची झुंज
बंगळुरूसाठी १७ वर्षीय सरफराजने एकाकी झंुज देत नाबाद ४५ धावांची खेळी केली. त्याने २१ चेंडूंत ४५ धावा काढल्या. यात ६ चाैकार व १ षटकाराचा समावेश अाहे.

मनदीप-एल्बीची भागीदारी
बंगळुरूसाठी मनदीप व डिव्हिलर्सने तिसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. डिव्हिलर्सने ५७ धावांचे याेगदान दिले. त्याने ४५ चेंडूंत नऊ चाैकार व एका षटकारासह अर्धशतक झळकवले.