आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Challengers Bangalore Vs Delhi Dear Devils IPL 6 Cricket

IPL : बंगळुरूचा दिल्‍लीवर ‘सुपर’ विजय !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये शानदार खेळ करून दिल्ली डेअरडेव्हिल्सला 4 धावांनी हरवले. सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 6 चेंडूंत 15 धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली डेअरडेव्हिल्सला 6 चेंडूंत 2 बाद 11 धावाच काढता आल्या. बंगुळरूकडून सुपर ओव्हरमध्ये द. आफ्रिकेचा फलंदाज डिव्हिलर्सने दोन षटकार खेचून 13 धावा काढल्या. यानंतर वेगवान गोलंदाज रवी रामपॉलने दोन विकेट घेऊन बंगळुरूचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी, निर्धारित 20 षटकांत दोन्ही संघांनी 152 धावा काढल्या होत्या.

बंगळुरूचा हा सहा सामन्यांत चौथा विजय ठरला. या विजयासह विराट कोहलीची ही टीम गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा आयपीएल-6 मधील हा सलग पाचवा पराभव ठरला. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज असताना दिल्लीने धक्कादायक निर्णय घेताना वॉर्नरसोबत सेहवागला न पाठवता युवा खेळाडू रोहररला फलंदाजीस पाठवले. वॉर्नर बाद झाल्यानंतरही सेहवागऐवजी इरफान पठाणला फलंदाजीस पाठवले. वॉर्नर शून्यावर बाद झाला. इरफानने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना नाबाद 11 धावा काढल्या. युवा खेळाडू रोहररला भोपळासुद्धा फोडता आला नाही. सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रामपॉलने त्याला बोल्ड केले.

कोहलीचे अर्धशतक
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 153 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 65 धावा काढल्या. त्याने 50 चेंडूंत 1 षटकार आणि 7 चौकारांसह ही खेळी केली. क्रिस गेल (13) या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. द. आफ्रिकेचा खेळाडू एल्बी डिव्हिलर्सने 32 चेंडूंत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 39 धावा ठोकल्या.