आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या गोलंदाजीचे नियोजन कोलमडल्याने पराभव : द्रविड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्ले ऑफमध्ये राजस्थान रॉयल्स संघाला पराभव पत्करावा लागल्याने काहीसा निराश झालेल्या राहुल द्रविडने आमच्या गोलंदाजीचे नियोजन कोलमडल्याने पराभव पत्करावा लागल्याचे नमूद केले.
चांगली कामगिरी करणार्‍या संघाला अशा पद्धतीने बाहेर पडावे लागल्याचे वाईट वाटते. मात्र, त्या विजयाचे श्रेय मुंबईच्या फलंदाजांना द्यावेच लागेल. अवघ्या 14.3 षटकात 190 धावसंख्येचा पाठलाग करीत 195 धावा करणे ही खरोखरच अफलातून कामगिरी आहे. त्यांचे फलंदाज खूपच चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचा त्यांना फायदा झाला. अखेरच्या दोन षटकांमध्ये सामना आमच्या हातून निसटल्याचेही द्रविडने नमूद केले. रोहित बाद झाल्यानंतर अँडरसन आणि रायडूने अवघ्या 15 चेंडूंमध्ये जवळपास 50 धावा केल्याने आमच्या गोलंदाजांची गोलंदाजी दिशाहीन झाल्याचेही द्रविडने सांगितले. अर्थात आमच्या गोलंदाजांनी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, कधी कधी समोरचे फलंदाज फारच चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असल्यास गोलंदाजांचाही नाइलाज होतो, असेही द्रविड म्हणाला. या पराभवामुळेच राजस्थान रॉयल्सचे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे स्वप्नही धुळी मिळाले. या वेळी नायर आणि सॅमसनची झुंजही व्यर्थ ठरली.