आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेलिंग्टन - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर कोमातून बाहेर आला असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती त्याचे व्यवस्थापक एरॉन क्ली यांनी दिली आहे. त्याची दुखापत गंभीर असून, आणखी काही दिवस अतिदक्षता विभागातच त्याला राहावे लागणार आहे, असेही क्ली यांनी स्पष्ट केले. परंतु, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रायडरला हल्ल्याबाबत सध्या काहीही आठवत नसल्याचेही क्ली यांनी सांगितले.
एका बारबाहेर बुधवारी रात्री रायडरला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत रायडर गंभीर जखमी झाला होता. तो कोमामध्ये गेला होता. परंतु, आता तो कोमातून बाहेर पडल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे एक मोठे आव्हान त्याच्यापुढे आहे. क्ली यांनी त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, तो आमच्यासोबत बोलू लागला आहे. त्याचा श्वासोच्छवासही सव्रसामान्य झाला आहे. प्रकृतीत सुधारणा आहे. परंतु, पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. ते एक मोठे आव्हान असल्याचे क्ली म्हणाले.
दरम्यान, रायडरला मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन व्यक्तींवर आरोप निश्चित केले आहेत. मारहाण झाल्यानंतर रायडर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. परंतु, त्याला आता हल्ल्याबाबत काहीही आठवत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.