आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाहत्यांनी पुन्हा दिली आयसीसी पुरस्कारासाठी सचिनला पसंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नामांकन पुरस्कारासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पसंती दिली आहे.
आयसीसीने सचिनला दोन वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१०मध्ये तर संगकाराला २०११मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आलं होते . या पुरस्कारांसाठी 'आयसीसी'च्या नामांकन यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकारा, दक्षिण आफ्रिकेचा डुओ वेरनॉन फिलॅंडर, जॅक कॅलीस व इंग्लंडचा जेन्स अँडरसन यांच्या नावांचा समावेश आहे.
'आयसीसी'च्या अधिकृत फेसबुकवरील पेजवर नागरिकांनी सचिनला पसंती दिली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूच्या नावावर मत नोंदविण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. 15 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.