आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनचा दबदबा आजही कायम: जो डावेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- सचिन तेंडुलकरचा दबदबा आजही चाहता व आपल्या सहकार्‍यांमध्ये कायम आहे, असा दावा टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डावेसने केला. गेल्या नऊ महिन्यांपासून डावेस सचिनसोबत आहे.

‘सहकारी खेळाडू सचिनची प्रत्येक शैली आत्मसात करतात. मास्टरब्लास्टरप्रमाणेच हे खेळाडू बॅट हातात घेऊन बसमध्ये बसतात. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे सचिन जवळून लक्ष देतो आणि चांगली कामगिरी करतो. सचिनच्या उपस्थितीमुळे ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंचा उत्साह वाढतो,’ असेही त्याने सांगितले.