आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin, Bradman And Lara Does Not Included In Dicky Bird Dream Team

डिकी बर्डच्या ड्रीम टीममध्ये सचिन, ब्रॅडमन, लारा नाही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक लोकप्रिय पंच इंग्लंडच्या डिकी बर्ड यांनी कसोटी इतिहासातील आपल्या सर्वकालीन महान एकादशची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या संघात आश्चर्यकारकपणे सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन यांना निवडले नाही. शुक्रवारी आपला 80 वा वाढदिवस साजरा करणा-या डिकी बर्ड यांनी संघात अशा अकरा खेळाडूंची निवड केली, जे त्यांच्या दृष्टीने महान कसोटी क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या टीममध्ये सचिन आणि ब्रॅडमनशिवाय रिकी पाँटिंग आणि ब्रायन लारा यांनासुद्धा स्थान मिळाले नाही.

डिकी यांच्या सर्वश्रेष्ठ अकरा खेळाडूंत माजी कर्णधार सुनील गावसकर एकमेव भारतीय खेळाडू आहेत. गावसकर यांच्यासोबत सलामीसाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे बॅरी रिचर्ड्स यांची निवड केली. डिकी यांच्या नजरेत गावसकर आणि रिचर्ड्स जगातले महान सलामीवीर आहेत.

डिकी बर्ड यांची ड्रीम टीम :
सुनील गावसकर, बॅरी रिचर्ड्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, ग्रेग चॅपल, गॅरिफील्ड सोबर्स, ग्रीम पोलक, अ‍ॅलन नॉट, इम्रान खान, डेनिस लिली, शेन वॉर्न, लान्स गिब्स.