» Sachin Dengerious For Kangaroo

सचिन कांगारूंसाठी सर्वाधिक धोकादायक

वृत्तसंस्था | Feb 22, 2013, 06:10 AM IST

  • सचिन कांगारूंसाठी सर्वाधिक धोकादायक

चेन्नई - चेन्नईचे मैदान सचिनसाठी खास आहे. यामुळेच क्लार्कसह आजी-माजी सर्व खेळाडू या मालिकेत कांगारूंसाठी सचिनच सर्वाधिक धोकादायक असल्याचे मानत आहेत.

सचिनने चेपॉक नावाने सुप्रसिद्ध मैदानावर आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळताना 87.6 च्या शानदार सरासरीने तब्बल 876 धावा काढल्या आहेत. अशा परिस्थितीत तो येथे ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकतो. येथे धावा काढण्याबाबत सचिनपेक्षा फक्त सुनील गावसकरच पुढे आहे.

सचिनने या मैदानावर पाच शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे. येथे 165 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे. ही कामगिरी त्याने इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी 1993 मध्ये केली होती. या वेळीसुद्धा सामना फेब्रुवारीत आहे. कांगारू चिंतित आहेत. कसोटीतील अखेरच्या डावात दुबळा फलंदाज म्हणून सचिनवर नेहमी टीका होते. याच सचिनने येथे इंग्लंडविरुद्ध 2008 मध्ये आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदा चौथ्या डावात नाबाद शतक (103) धावा काढून भारताला 387 धावांचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला.
या मैदानावर सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाजसुद्धा सचिनच आहे. त्याने येथे पाच शतके ठोकली आहेत. यातील दोन इंग्लंड, दोन ऑस्ट्रेलिया आणि एक पाकिस्तानविरुद्ध शतके काढली. यापैकी चार वेळा टीम इंडियाने विजय मिळवला.

Next Article

Recommended