आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग कर्करोगाशी लढून जिंकला. हा लढा सुरु असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याला भेटायला लंडनला सपत्निक गेला होता. त्यावेळी सचिनला एकच भय होते. युवराजसमोर त्याच्या डोळ्यातून पाणी आले तर? सचिनने कसेबसे स्वतःला सावरले.
युवराजने लिहीलेले 'द टेस्ट ऑफ माय लाईफ' पुस्तक काल प्रकाशित झाले. त्यावेळी सचिन तेंडुलकर आवर्जून उपस्थित होता. युवराजवर अमेरिकेत उपचार करण्यात आले. त्यानंतर तो लंडनला गेला होता. तेथे सचिनने पत्नी अंजलीसह त्याची भेट घेतली होती. त्याबाबत सचिन म्हणाला, युवराजसमोर मला हळवे व्हायचे नाही, असे मी अंजलीला सांगितले होते. जेव्हा मी युवराजला भेटलो तेव्हा त्याला घट्ट मिठीत घेतले. त्यानंतर आम्ही एकत्र जेवलो. त्याक्षणाला युवीला पाहून मला वाटले की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही यावेळी उपस्थित होता. तो म्हणाला, युवीने मला कर्करोगाबाबत सांगण्यापूर्वीच मला आजाराची माहिती होती. त्याच्या तपासण्यांचा अहवाला आल्यानंतर एका जणाने मला सांगितले की युवीला कर्करोग आहे. मी त्याला पुन्हा विचारले. तेव्हा हे खरे असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले होते.
युवीने मैदानावरील काही आठवणी सांगितल्या. धोनीबाबत युवराजने सांगितले, फलंदाजी करताना धोनी जास्त बोलत नाही. परंतु, वन डे विश्वचषक स्पर्धेत ऑस््ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात बाद झाल्यानंतर त्याला भावना आवरता आल्या नाही. परत जाना तो मला म्हणाला होता, शाबास युवी, सामना जिंकूनच ये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.