आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, ध्यानचंदला यंदाही भारतरत्न नाही!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद आणि क्रिकेटचा देव म्हणून संबोधले जात असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला यंदाही 'भारत रत्न' पुरस्कार मिळणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'भारतरत्न'साठी क्रीडा क्षेत्राचा पंतप्रधान कार्यालयाने समावेश केला असला तरी क्रीडा मंत्रालयाकडून सचिन अथवा ध्यानचंद या दोघांच्याही नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, हॉकी इंडिया व बीसीसीआयकडूनही काहीही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
द्रविडला पद्मभूषणची शिफारस- मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयासा ज्या खेळाडूंचा सन्मान करावा अशी शिफारस केली आहे त्यात राहुल द्रविडचे नाव आहे. त्याला पद्मभूषण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने सचिनला भारतरत्न द्यावा अशी कोणतेही मागणी केली नाही. क्रीडा मंत्रालयाने शूटर विजय कुमार व पेहलवान योगेश्वर दत्त यांना पद्मश्री देण्याची शिफारस केली आहे. या दोघांनी लंडन ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.