आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघाचि माहोल सचिनमय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे कडवे विरोधक राज ठाकरे, बॉलीवूड स्टार आमिर खान आणि वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड किंवा केंद्रीय मंत्री तथा भारतीय फु टबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्यात काय साम्य असेल? ते म्हणजे ही मंडळी एकाच छताखाली अन् एकाच विषयावर चर्चा करत होते, सचिन तेंडुलकर...
आमिर खान, राज ठाकरे आणि आशुतोष गोवारीकर हे तिघेही एकमेकांजवळ बसले होते आणि इतरांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. मैदानावर विविध राज्यांतील बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या वेळी एमसीएकडून वानखेडे मैदानावर बंदी घालण्यात आलेल्या शाहरुख खानची अनुपस्थिती मात्र तीव्रतेने जाणवली.
सचिन तेंडुलकरच्या 200 व्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचा साक्षीदार बनण्यासाठी एमसीए प्रेसिडेन्ट बॉक्सच्या आल्हाददायी वातावरणात अनेक सन्माननीय एकत्रित जमले होते. यात अजित वाडेकर, ब्रायन लारा, सचिनचे बंधू, त्याची डॉक्टर पत्नी अंजली (ज्या कोलकाता कसोटीवेळी सचिनची फलंदाजी न पाहताच मधूनच उठून गेल्या होत्या), मुले आणि अन्य नातेवाईकांचा समावेश होता. सर्व एकमेकांसोबत बसून सामन्याचा आनंद लुटत होते. मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण नीता अंबानी या रिलायन्स कंपनीच्या विशेष बॉक्सजवळ आपल्या मित्रमैत्रींणीसोबत बसून सामन्याचा आनंद लुटत होत्या, परंतु त्यांचे पती मुकेश मात्र कुठेच दिसले नाहीत.
येथे उपस्थित प्रत्येकजण सामन्याचा आनंद घेत असताना एकच व्यक्ती मात्र अशी होती जी संपूर्ण खेळ तन्मयता व शांततेने पाहत होती. त्यांच्या चेह-यावर अस्फूट काळजी स्पष्ट दिसत होती. त्या म्हणजे सचिनची आई रजनी तेंडुलकर. पांढ-या रंगाची शॉल ओढून त्या व्हीलचेअरवर बसल्या होत्या. त्यांच्यापासून अगदी जवळच सोफ्यावर सचिनची पत्नी अंजली आणि नुकतेच एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झालेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बसले होते.
जगविख्यात मुलाचा खेळ पहिल्यांदा पाहताना तुम्हाला कसे वाटत आहे? असा प्रश्न दैनिक दिव्य मराठीकडून सचिनच्या आईला विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, सचिनने सावधपणे खेळून मोठी धावसंख्या उभारावी. सचिनच्या यापूर्वीचे सामने बघण्यासाठी कधीच का आल्या नाही, या प्रश्नावर पांगुळलेले बोट मांडीवर ठेवत त्या म्हणाल्या की, वेगवान चेंडूमुळे सचिनच्या चेह-याला किंवा डोक्याला इजा झाली तर ती बघण्याची माझ्यात हिंमत नव्हती. माझ्या तब्येतीमुळेही घरातून बाहेर पडणे अशक्य होते. बराच वेळेपर्यंत बसून राहणे अशक्यप्राय होत असल्यामुळे त्या घरी जाऊ इच्छित होत्या.
राज ठाकरेसुध्दा सामना सुरू असताना उठून गेले, मात्र वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शिलिंगफोर्डच्या गोलंदाजीवर शिखर धवन आणि मुरली विजय बाद झाल्यानंतर ते परतले. भारतीय संघाचा गडी बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करण्याची ही खुप दुर्मिळ बाब होती. कारण लोकांना सचिनच्या आगमनाची प्रतिक्षा होती. सर्व प्रेक्षकांनी उभे राहून दिलेल्या अभिवादनासह तो मैदानात आला आणि सहा चौकारांच्या मदतीने संयमी खेळी करत 73 चेंडूत नाबाद 38 धावा फटकावल्या. यामुळे सचिनची आई आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी त्यांच्या घरी जाण्याचा बेत लांबवला. आपल्या कामगिरीने इतिहासाच्या पानात सुवर्णअक्षरांनी नाव कोरलेल्या आपल्या आवडत्या शिष्योत्तमाला मैदानात पाहण्यासाठी आजारी आचरेकरांना त्यांचा मुलगा आणि जावयाने स्टेडियमवर आणले.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी पहिल्या तीन विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व करणा-या क्लॉईव्ह लॉईड यांच्याजवळ जाऊन स्वत:ची ओळख करुन दिली. त्यानंतर लॉईड यांनी माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत काही वेळ घालवला. 30 वर्षांपूर्वी हे दोघेही प्रुडेन्शियल वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत एकमेकांविरुध्द खेळले होते. 1983 मध्ये भारताने हा विश्वचषक जिंकला होता.
दरम्यान, महाराष्‍ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्य पव्हेलियन ताज्या फुलांनी सजविण्यात आले होते आणि प्रवेशद्वारावर कालिकत (केरळ) च्या कलाकारांनी तयार केलेली मोठी छायाचित्रे (ऑईल आणि कॅन्व्हास) लावण्यात आली होती.
तत्पूर्वी, विक्रमवीर सचिनवर काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन सकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल यांनी केले. मुंबईत सर्वत्र लाडका हिरो सचिनला सॅल्यूट करणारे सर्व प्रकारचे पोस्टर्स झळकत आहेत. यात मुंबई वाहतूक पोलिसही मागे राहिले नाहीत. मैदानाबाहेर त्यांनी गडद निळ्या रंगाचा बॅनर लावला आहे. सामन्यावेळी सचिननेसुध्दा निळ्या गडद रंगाचेच हेल्मेट घातले.