आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Feels To Write Letter To Anjali Is Tuff Than Batting

सचिन तेंडुलकर म्‍हणतो, फलंदाजीपेक्षा अंजलीला पत्र लिहिणे कठीण काम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्‍नई/ मुंबई - माझ्यासाठी फलंदाजीपेक्षा अंजलीला पत्र लिहिणे कठिण असल्‍याचे प्रतिपादन भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने केले आहे. तो हस्‍ताक्षर सुधार कार्यक्रमात बोलत होता.
सचिन म्‍हणला, की पूर्वीच्‍या काळी मोबाईल नव्‍हते, तेव्‍हा पत्राद्वारेच भावनांची आदान- प्रदान होत असे. मी पत्र लिहिल्‍यास कित्‍येक वेळ ते वाचत असे, आणि नंतरच अंजलीला पाठवत असे.
मागील घटनांना उजाळा
मास्‍टर ब्लास्‍टर सचिन तेंडुलकर जुन्‍या आठवणींना उजाळा देताना म्‍हणाला, अंजलीचे हस्‍ताक्षर अन्‍य डॉक्‍टरांसारखे नसून अतिशय सुंदर आहे. क्रिकेटमधील त्‍याचा सहकारी अनिल कुंबळे अ‍ाणि सुब्रतो बॅनर्जी यांच्‍या हस्‍ताक्षराचीही त्‍याने स्‍तुती केली. वडील साहित्यिक असल्‍याने घरामध्‍ये लिहिण्‍याचे वातावरण राहिले असल्‍याचेही तो म्‍हणाला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सचिन लिहितो आत्‍मकथा