आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशतकाबाबत सचिनची थट्टा उडविताहेत पाकिस्तानी माध्‍यमे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेल्‍यापासून पराभवाचा सामना करत असलेल्‍या टीम इंडियाला आता स्‍वकीयांबरोबर परदेशी खेळाडूंकडूनही टीकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. टीम इंडियाला ऑस्‍ट्रेलियातील पहिल्‍या विजयाची प्रतिक्षा आहे, तर सचिन तेंडुलकरला महाशतकासाठी एका शतकाची आवश्‍यकता आहे. पाकिस्‍तानी माध्‍यमांनी सचिनच्‍या महाशतकावरून थट्टा उडवण्‍यात येत आहे. (‍व्हिडिओ पाहण्‍यासाठी आणि अधिक माहितीसाठी रिलेटेड आर्टिकलवर क्लिक करा)

'महाशतक महत्‍वाचे नाही'
टीम इंडियाला सध्‍या सचिनच्‍या महाशतकाची गरज नसून विजयाची गरज असल्‍याचे पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इमरान खानने म्‍हटले आहे. परंतु, तो आपले शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा देखील त्‍याने व्‍यक्त केली. टीम इंडियाच्‍या युवा क्रिकेटपटूंच्‍या अपयशाबाबत त्‍याने टीका केली. भारतीय संघातील एकही युवा खेळाडू कसोटीसाठी योग्‍य नसल्‍याचे त्‍याने सांगितले.

धोनीच्‍या बचावासाठी कपिल, सिद्धू मैदानात
अडचणीत सापडलेल्‍या टीम इंडियाच्‍या बचावासाठी माजी खेळाडू आता पुढे सरसावले आहेत. माजी क्रिकेटपटू नवज्‍योतसिंग सिद्धूने धोनी चांगला खेळाडू असून त्‍याच्‍यावर विश्‍वास दाखवण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हटले.

धोनी आपल्‍या संघाचा कर्णधार आहे आणि आपण त्‍याला साथ दिली पाहिजे. संघाला आपल्‍या समर्थनाची गरज आहे. अशावेळेस चाहत्‍यांनी संघाला साथ्‍ा दिली पाहिजे, असे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्‍हटले.

‘‘भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीला टी-20 किंवा कमी षटकांचे क्रिकेट जबाबदार नाही, असे कपिलदेव यांनी स्पष्ट केले. सध्या मालिका सुरू असताना संघात फारसे बदलही करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. सध्याचा भारतीय संघ उत्तम संघ आहे. त्यांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. त्यांनी एकसंघ होऊन लढा देण्याची गरज आहे.

कपिलदेव यांनी भारतीय क्रिकेट रसिकांनादेखील सबुरीचा, संघावर विश्वास टाकण्याचा सल्ला दिला आहे. अनावश्यक सनसनाटी निर्माण करण्याची ही वेळ नाही. या संघाला स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कप्तानाने स्वत:च्या आणि संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पुनरागमनासाठी संघाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे.’’ असे ते म्हणाले.
सचिनच्‍या महाशतकाची थट्टा, पाहा व्हिडिओ...