आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनकडून सरिताला जर्सीची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आशियाईमध्ये कांस्यपदक परत करणारी महिला बाॅक्सरपटू सरितादेवी हिला भेटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने तिच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिला ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट देऊन ऑलिम्पिकच्या तयारीवर भर देण्यास सांगितले.
सरितादेवीला भेटल्यानंतर सचिनने सांगितले की, मला तिच्या डोळ्यात विजयाची भूक दिसली. तसेच मी तिच्या जर्सीवर खेळाचा आनंद घेताना त्यासाठी सर्वोत्तम द्यावे, असे लिहिल्याचे नमूद केले.
सरितादेवीने सचिनच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्यानंतर सचिनने याबाबतचे ट्विट त्याच्या ट्विटरवर केले आहे. त्याला भेटून आल्यानंतर सरितादेवीने सांगितले की, मी त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्या संपूर्ण प्रकरणात माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांची कायमच ऋणी राहीन, असेही सरितादेवीने म्हटले आहे. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक देण्यात आल्याने संतप्त सरितादेवीने ते पदक पाेडीयमवरच नाकारल्याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.