आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने धाडसाने खेळण्‍यास सांगितले होते- शिखर धवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्‍ये ज्‍या धाडसाने खेळतो त्‍याचप्रमाणे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍येही खेळ असा सल्‍ला दिला होता, असे शिखर धवनने सांगितले. त्‍याचबरोबर सचिनबरोबर कसोटी खेळणे हा आयुष्‍यातील सर्वोच्‍च क्षण असल्‍याचेही त्‍याने म्‍हटले.

विक्रमी खेळी केल्‍यानंतर धवनने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्‍हणाला,' तो एक महान क्षण होता जेव्‍हा सचिनपाजींनी मला टेस्‍ट कॅप दिली. मी त्‍यांला लहानपणापासून खेळताना पाहत आलोय. हे स्‍वप्‍न साकार होण्‍यासारखे आहे.'

जेव्‍हा त्‍याला सचिनने काही सल्‍ला दिला होता काय, असे विचारले तेव्‍हा तो म्‍हणाला,' घरगुती क्रिकेटमधील एक धाडसी फलंदाज म्‍हणून तू ओळखला जातो. अगदी तेच धाडस तू आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये कायम ठेवशील अशी मी आशा करतो, असे सचिनने म्‍हटल्‍याचे धवनने सांगितले.

शिखर धवनने आपल्‍या पहिल्‍याच कसोटीत ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध 168 चेंडूत 185 धावांची खेळी केली. या खेळीदरम्‍याने त्‍याने अनेक विक्रम मोडीत काढले. कसोटी इतिहासाच्‍या 136 वर्षांत पर्दापणाच्‍या सामन्‍यात सर्वात वेगवान शतक झळकवण्‍याचा विक्रमही त्‍याने आपल्‍या नावे केला. धवनने अवघ्‍या 85 चेंडूत ही कामगिरी केली.