आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या दृष्टीने सचिन महानच : मायकेल क्लार्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - माझ्या दृष्टीने सचिन तेंडुलकर महान फलंदाज आहे. मी आतापर्यंत जेवढे खेळाडू बघितले आहे, त्यात सचिन ग्रेट आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले आहे.


क्लार्क म्हणाला, ‘प्रदीर्घ काळ खेळत राहणे आणि सलगपणे चांगली कामगिरी करणे हे त्याच्या महानतेचे लक्षण आहे. सचिनला फलंदाजी करताना पाहण्यात आजही आनंद मिळतो.’

सचिनची फलंदाजी असते आनंददायी
मी टी. व्ही. वर इराणी ट्रॉफीत त्याचे शतक बघितले. मी त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटला. आता मालिका भारताविरुद्ध होणार असल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून सचिनने आमच्याविरुद्ध अधिक धावा काढू नये, असे वाटत असल्याचे क्लार्क म्हणाला. आम्हाला या मालिकेत राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना गोलंदाजी करावी लागणार नाही, याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आनंद व्यक्त केला. हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध हमखास यशस्वी ठरत होते, असे तो म्हणाला.


भारताला नमवणे सोपे काम नाही
भारतात इंग्लंडच्या प्रदर्शनाने प्रेरणा घेणार काय, असे क्लार्कला विचारले असता तो म्हणाला, ‘आमच्या खेळाडूंनी त्या मालिकेचे सामने बघितले होते. भारतीय टीम किती मजबूत आहे, याची कल्पना आहे. ज्या संघात सचिन तेंडुलकर आहे, त्या संघाला त्यांच्याच जमिनीवर हरवणे सोपे नाही. मात्र, मी उपखंडात खेळून माझ्या अनुभवावरून एक गोष्ट शिकलो आहे, ती म्हणजे आपण नंबर एकचे किंवा कोणत्याही क्रमांकाचे फलंदाज असलो तरीही येथे संयम आणि सातत्यामुळेच यश मिळते.’