आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतला सचिन : ‘ईश्वरावर श्रद्धा असलेला क्रिकेटपटू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने अलीकडच्या म्हणजे गेल्या 5 ते 7 वर्षांच्या कालावधीत कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थानापर्यंत झेप घेण्याचा चमत्कार केला होता. या चमत्काराचे एक महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे रमेश बळवंत माने. ते संपूर्ण भारतीय संघाचे माने काका आहेत. ते संघाचे ‘मॅस्युअर’ (मसाज करणारे) आहेत. प्रत्येक खेळाडूला त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्या नजरेला सचिन तेंडुलकर कसा दिसला?
‘सचिन व्यक्ती म्हणून खूपच प्रेमळ आहे. त्याची ईश्वरावर श्रद्धा आहे. तो सगळ्यांना गुरुस्थानी वाटतो. प्रत्येक सामन्याच्या वेळी तो ज्या शहरात, गावात असेल तेथील देवालयात जाऊन देवाचे दर्शन घेतो. ते कार्य तो सर्वांच्या नकळत करतो. कारण त्या गोष्टीची प्रसिद्धी होणे त्याला आवडत नाही. म्हणून तो बºयाच वेळा सर्वजण साखर झोपेत असतानाच बाहेर पडतो व देवापुढे नतमस्तक होऊन येतो. सामन्याच्या आदल्या दिवशी तो सहसा कुणाला भेटत नाही.
सचिनची ध्यानमग्नता, साधना सुरू असते. त्यात व्यत्यय आलेला त्याला चालत नाही. क्रिकेटविषयी प्रचंड आदर असल्याने तो आपले साहित्य यांना फारच महत्त्व देतो. त्यांना तो प्राणांपेक्षाही जपत असतो. रागाने त्याने बॅट फेकून दिली आहे,’ अशी माने काका यांनी दिली.
सळसळते चैतन्य
सचिन तेंडुलकर म्हणजे ईश्वराचे एक सुंदर ‘रोल मॉडेल’ ंआहे. तो आला की वातावरणात चैतन्य भरते. जिवंतपणा येतो. सळसळते चैतन्य भरते. वातावरण भारावले जाते आणि सचिन गेला की ते ‘शून्य’ होते.