आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणापासूनच सचिन माझा आदर्श व नायक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर बालपणापासून माझा नायक आहे. मी त्याला बघूनच मोठा झालो. मी त्याच्यासोबत टीम इंडियाकडून खेळत आहे, याला मी स्वत:चे नशीब समजतो, असे धोनीने म्हटले. सचिनवर विमलकुमार यांनी लिहिलेल्या ‘सचिन क्रिकेटर ऑफ सेंच्युरी’ या पुस्तकाच्या विमोचनप्रसंगी धोनीने सचिनशी संबंधित आठवणींना उजाळा दिला.

धोनीने दहा वर्षांपूर्वीच्या एका घटनेची आठवण सांगितली. ‘पुण्यात आयोजित दुलिप ट्रॉफीच्या एका सामन्यात सचिन 199 धावांवर नाबाद होता. त्यावेळी मी माझ्या ईस्ट झोनच्या खेळाडूंना पाणी देण्यासाठी मैदानात गेलो. वेस्ट झोनकडून खेळणाºया सचिनने मला अचानक विचारले...मी पाणी पिऊ शकतो काय ?...माझ्या आदर्श व्यक्तीला समोर बघून मी घाबरलो. त्यावेळी माझ्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. मी मुकाट्याने पाण्याचा ग्लास सचिनपुढे केला’..असा किस्सा धोनीने सांगितला. सचिनच्या सूचनेनंतरच मला टीम इंडियाचा
कर्णधार बनवण्यात आले, हेसुद्धा सांगायला धोनी या वेळी विसरला नाही.

मैदानावर ब-याच वेळा एकमत नसते- मैदानावर सचिनसोबत रणनीतीबाबत चर्चा होते. ब-याच वेळा सचिन आणि माझे रणनीतीबाबत एकमत होत नाही. मात्र, खेळात असे होतच असते. मैदानावर माझा शब्द चालतो..मात्र मैदानाबाहेर सचिनसमोर बोलण्याची माझी हिंमत होत नाही. मी मैदानाबाहेर त्याच्यासमोर क्वचितच बोलू शकतो. आम्ही संघाचे सर्व सहकारी सचिनला प्रेमापोटी पाजी म्हणतो. हा शब्द पंजाबी असला तरीही आम्ही सचिनच्या सन्मानापोटी त्याला या नावाने हाक मारतो. फक्त श्रीसंत त्याला भैया म्हणतो, असेही धोनीने सांगितले.

वॉटसन-क्लार्कने वाद संपवावा : स्टीव्ह वॉ - कर्णधार मायकेल क्लार्क आणि अष्टपैलू शेन वॉटसन यांच्यात मतभेद असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉलासुद्धा वाटते. सध्याच्या परिस्थितीत क्लार्क आणि वॉटसन यांनी संघाच्या भल्यासाठी आणि कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आपसातील मतभेद, वाद लवकर संपुष्टात आणले पाहिजेत. तुम्हाला ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे असेल तर मग दोघांना एकत्र मिळूनच चालावे लागेल,’ असे वॉने म्हटले.

वॉटसनकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय योग्यच- क्लार्कच्या अनुपस्थितीत वॉटसनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर एड. कोवानने व्यक्त केले. वॉटसन पुनरागमनासाठी तयार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास आम्हाला काहीच अडचण नाही. वॉटसन महान खेळाडू आणि महान फलंदाज आहे, असेही कोवानने नमूद केले.

दोघेही बोलले नाहीच- बुधवारी ऑस्ट्रेलियन टीमने कोटलावर सराव केला. या वेळी क्लर्क आणि शेन वॉटसन यांच्यात संवाद झाल्याचे पाहण्यात आले नाही. दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. वॉटसनने कोच आॅर्थर आणि स्टीव्हन स्मिथशी प्रदीर्घ चर्चा केली. मात्र, क्लार्कशी संवाद टाळलाच.