आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयात सचिन नाबाद,शेवटच्या सामन्यात 74 वर बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वानखेडे स्टेडियम, मुंबई - गेल्या चोवीस वर्षांत सचिन आऊट झाला म्हणून टीव्हीच फोडून टाकणारे या देशात शेकडोंनी असतील. मात्र शुक्रवारी जेव्हा नरसिंह देवनारायणच्या चेंडूवर सॅमीने सचिनचा (74) झेल टिपला तेव्हा अवघा देश स्तब्ध झाला. सन्मानार्थ पापण्या मिटल्या. जणू काही 24 वर्षांच्या अगणित आठवणींचे वजन प्रत्येकाच्या पापणीवर पडले असावे. जो-तो जेथे होता, तेथेच थबकला.. ऐतिहासिक विजय मिळवून कृतकृतार्थ स्मितहास्याने एक योद्धा सर्वांचा निरोप घेत होता...
वनडेत सचिनच्या 200 धावा प्रत्येकालाच अद्वितीय व अंतिम टप्पा वाटत होता. मात्र नंतर सेहवाग व रोहित शर्माने तो गाठला. मात्र, आता इतर कुणाला 200 कसोटी सामने खेळण्याचा पल्ला गाठणे अशक्यच असल्याचे वाटू लागले आहे. सचिननेच तो गाठलाय, कोण जाणे पुढे तो कुणी गाठू शकेल? 74 धावांच्या खेळीनंतर सचिन जेव्हा तंबूत परतला तेव्हा स्टेडियममधील चाहतेही घरी परतू लागले. देशही टीव्हीसमोरून उठून गेला.
या सामन्याची दिशा व दशेकडे पाहता शनिवारीच तो संपेल, अशी शक्यता क्रिकेट विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कारण, वेस्ट इंडीजवर भारताने 313 धावांची भरभक्कम आघाडी घेतली आहे. दुस-या डावातही विंडीजची घसरगुंडी उडाली असून 3 बाद 43 अशी परिस्थिती आहे. शनिवारी वेस्ट इंडीज 313 पेक्षा कमी धावांवर बाद होण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच भारत पुन्हा डावाने विजय मिळवण्याकडे वाटचाल करतोय. मात्र सचिनचे चाहते अद्यापही त्याच्या दुस-या डावातील फलंदाजीच्या प्रतीक्षेत आहेत. दुस-या डावात विंडीज चांगले खेळावे.. मोठी धावसंख्या उभारावी, म्हणजे सचिनला पुन्हा फलंदाजीसाठी येता येईल, अशी भाबडी आशा देश लावून बसलाय....
सचिनच्या आसपास पोहोचणे कठीण
खेळाडू वय कसोटी प्रतिवर्ष कसोटी सचिनच्या बरोबरीसाठी खेळाव्या लागणार
जॅक कॅलिस 38 164 08 36 कसोटी/ 5 वर्षे सतत
एस.चंद्रपॉल 39 150 10 50 कसोटी/ 5 वर्षे सतत
महेला जयवर्धने 36 138 08 62 कसोटी/ साडेसात वर्षे सतत
आपले धुरंधर
महेंद्रसिंग धोनी 32* 79 08 122/15 वर्षे सतत
विराट कोहली 25 20 08 180/23 वर्षे सतत
शिखर धवन 28 03 08 197/24 वर्षे सतत
वयाच्या चाळिशीपर्यंत सचिन 24 वर्षे खेळला. तब्बल 200 कसोटी. सुमारे 16 हजार धावा. क्रिकेटविश्वात असा कोण आहे जो सचिनची बरोबरी करू शकेल? पाहूया...
यामुळे कठीण
1.सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली. 200 कसोटी खेळण्यासाठी त्याला 24 वर्षे लागली.
2. सर्वाधिक कसोटी सामने खेळणा-या यादीतील सचिन आणि द.आफ्रिकेचा जॅक कॅलिस वगळता सर्व खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. कॅलिसने 164 कसोटी सामने खेळले आहेत.
3. सध्या प्रत्येक देश एका वर्षात 12 किंवा 13 कसोटी सामने खेळतो. सचिनची बरोबरी करावयाची असेल तर कॅलिसला अजून 5 वर्षे सतत कसोटी खेळाव्या लागतील. पण ते आता शक्य वाटत नाही. कारण कॅलिसचे वय सध्या 38 वर्षे आहे.
4. सचिनसारखे समर्पण आणि तंदुरुस्तीच्या बळावरच या शिखरापर्यंत पोहोचता येते. जे सध्याच्या खेळाडूत खूप कमी प्रमाणात दिसून येते, असे सुनील गावसकर आणि कपिल देव
यांचे मत आहे.