आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढले केवळ वय, फटके पूर्वीसारखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंडीजविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी सचिनचाच बोलबाला होता. त्याने सहा चौकारांसह नाबाद 38 धावांची खेळी करीत दुस-या दिवसाच्या खेळीची उत्सुकता वाढविली. गुरुवारी सचिनची खेळी बघून असे वाटले की त्याचे केवळ वय वाढले आहे. बाकी, खेळ तसाच आहे. हा, पूर्वी फटक्यांमध्ये ताकद होती. मात्र, आता त्यात टायमिंग आणि जबरदस्त पंचदेखील येऊन मिळाला आहे. तसेच सचिन थोडा अधिक रक्षात्मक झाला आहे.
सचिनने गुरुवारी असेच फटके मारले जसे तो 2008 ते 11 दरम्यानच्या त्याच्या कारकीर्दीत लावत होता. दोन अत्यंत सुरेख कव्हर ड्राइव्हचे फटकेही त्याने मारले. ज्याप्रमाणे गुरुवारी खेळला, ती लय कायम राखू शकला तर शुक्रवारी तो मोठी खेळी खेळू शकतो. यापेक्षा अधिक यादगार निवृत्ती कोणती होऊ शकेल. 1990 ते 2005 दरम्यानच्या काळात सचिनचे अपरकट अधिक उंचीचे असायचे. मात्र आता तो मोजून मापून फटके मारतो. स्ट्रेट ड्राइव्ह आतादेखील अधिक चांगले आहेत. पायांच्या हालचाली तितक्या चांगल्या राहिलेल्या नाहीत. बॅकफूटवर तो गफलत करतोय. मात्र गुरुवारी ही कमजोरी दिसली नाही. तो आता प्रत्येक चेंडू मारायच्या ऐवजी त्या चेंडूच्या योग्यतेनुसार खेळू लागला आहे. पूर्वी अक्रम, वकार आणि शोएबसारख्या गोलंदाजांना उचलून छक्के मारायचा. मात्र आता उसळत्या चेंडूंवर अधिक फटके मारत नाही.
सचिनजवळ पूर्वीपासूनच स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह आणि लेगग्लान्स हे अत्यंत चांगले फटके आहेत. त्याच्या पसंतीचे हे फटके त्याने काल वानखेडेवर मारले. तो भलेच संन्यास घेत असेल. मात्र आजही तो स्वबळावर संघातील स्थान राखू शकतो.