आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या हस्ते मुंबई इंडियन्सच्या स्मॅशकार्डचे अनावरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएलच्या हंगामातील मार्केटिंग क्लृप्त्या लढवून आपापले उखळ पांढरे करण्याच्या प्रयत्नांना ऊत येतो. आज मुंबई इंडियन्सच्या आणि सचिन तेंडुलकरच्या लोकप्रियतेच्या आधारावर लोअर परेल येथील ‘स्मॅश’ एंटरटेन्मेंटने ‘मुंबई इंडियन्स का अड्डा’ या नावाने आपल्या जुन्याच जागेचे नामकरण केले. सचिन तेंडुलकरच्या हस्ते या वेळी ‘मुंबई इंडियन्स स्मॅशकार्ड’चे अनावरण करण्यात आले. या कार्डच्या आधारे संपूर्ण मुंबईतील युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी विविध पुरस्कार व बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत.