आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, राहुल द्रविड पाकमध्ये खेळणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरण निर्मितीसाठी कंबर कसली आहे. पीसीबीच्या या मोहिमेत भारतातील दोन दिग्गज सहभागी होण्याची शक्यता आहे.त्यानुसार आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड प्रर्दशनीय सामना खेळण्यासाठी पाकचा दौरा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली.

मार्च २००९ मध्ये पाक दौ-यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघातील खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्यापासून कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय संघाने अद्याप क्रिकेटसाठी पाकचा दौरा केलेला नाही. त्यामुळे पाकमधील क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

यासाठी पाकचे माजी राजकीय नेते शहरयार खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांची भेट घेतल्याचे सांगितले. या भेटीदरम्यान आम्ही पाकमध्ये प्रर्दशनीय सामना आयोजित करण्यासाठी पीसीबीला पूर्णपणे सहकार्य करू शकतो, असे बिशनसिंग यांनी सांगितले. बेदी यांनी माझी भेट घेतली. या वेळी ते म्हणाले की पाकमध्ये प्रर्दशनीय सामना खेळण्यासाठी मी सचिन आणि द्रविडची मनधरणी करू शकतो, असेही शहरयार यांनी सांगितले.