आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीसाठी आग्रह केला जाऊ शकत नाही : सचिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- क्रिकेटमध्ये कोणत्याही फॉर्मेटची आवड हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा मामला आहे. कोणालाही कसोटी क्रिकेट आवडावे म्हणून आग्रह किंवा बाध्य केले जाऊ शकत नाही, असे सचिन तेंडुलकरने म्हटले. ईएसपीएनच्या एका कार्यक्रमात सचिन म्हणाला, ‘असा कोणताच फॉर्म्युला बनलेला नाही, ज्यामुळे कसोटी क्रिकेट तुम्हाला पटकन आवडू लागेल. मी बालपणापासून भारतासाठी कसोटी खेळण्याचे स्वप्न बघत होतो. हे स्वप्न पूर्ण करणे मोठी गोष्ट आहे. त्या वेळी मी वनडे क्रिकेटबाबत विचार केला नव्हता. जगात असे अनेकजण आहेत, ज्यांना वाटते की त्यांनी कसोटी क्रिकेट खेळले नाही तरीही त्यांचे काही नुकसान होणार नाही. कसोटी क्रिकेट आवडण्यासाठी अशा लोकांना तुम्ही आग्रह करू शकत नाही,’ असेही त्याने म्हटले. आपण भारताच्या कसोटी संघाचे सदस्य असले पाहिजे, असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्याचा मार्ग स्वत: शोधून काढेल, असेही यावेळी त्याने म्हटले.