नवी दिल्ली – भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण सुरु असताना 'क्रिकेट डिप्लोमसी'च्या माध्यमातून भारत-पाक संबंध सुधारण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी निमंत्रित केले आहे. सचिन तेंडुलकर आणि
राहुल द्रविड यांनी सजलेली माजी क्रिकेटपटूंची टीम पाकिस्तानात मैत्रीपूर्ण लढतीसाठी खेळायला यावी अशी अच्छा शहरयार खान यांनी व्यक्त केली आहे.
मार्च, 2009 मध्ये पाकिस्तानात श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानच्या भूमित खेळल्या गेला नाही. सुरक्षेच्या कारणावरून क्रिकेटसंघ पाकिस्तानात खेळण्यास टाळतात.
शहरयार खान सध्या क्रिकेट खेळणा-या देशांच्या दौ-यावर आहेत. त्यांनी भारताचे माजी फिरकीपटू बिशन सिंह बेदी यांची भेट घेवून याविषयी चर्चा केली होती.
श्रीनिवासन यांनी दर्शवली तयारी
शहरयार खानने गेल्या रविवारी बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यासोबत दुबईत चर्चा केली. श्रीनिवासन यांनी यासंबंधी तयारी दर्शविली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, का खेळल्या गेले नाही भारत पाकिस्तान सामने?