आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Attacks Greg Chappell, Calls Him A 'Ringmaster' In His Book

सचिनला पाकिस्तानने केले रन आउट आणि येथे सुरु झाली होती ‘दंगल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाइल फोटो: लाठीचार्ज करताना पोलिस

भारत आणि पाकिस्‍तान या उभय देशातील क्रिकेट सामना म्हणजे ‘युध्‍दसमान’ भासत असतो. सचिन तेंडूकरचा असाच धावचित होण्‍याचा वाद प्रसिध्‍द आहे. तेव्‍हा प्रेक्षकांची चक्‍क दंगल केली होती. संभाव्‍य दंगल रोखण्‍यासाठी पुढील सामना विना प्रेक्षकांचा घ्‍यावा लागला होता.

सचिन तेंडुलकर खेळपट्टीवर असताना पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर गोलंदाजी करत होता. 19 फेब्रुवारी 1999 रोजी कोलकात्‍याच्‍या ईडन गार्डनवर हा सामना सुरु होता. 43 व्‍या षटकात तेंडूलकर धाव घेत असताना शोएब त्‍याच्‍या मध्‍ये आला तरीही पंचांनी सचिनला धावबाद होण्‍याचा निर्णय दिला होता. तेव्‍हा स्‍टेडिअमध्‍ये दंगलीसारखे दृश्‍य तयार झाले होते.

विना प्रेक्षक खेळला गेला सामना

जगमोहन दालमिया आणि सचिनने पोलिसांना सहकार्य करत जनतेला शांत राहण्‍यासाठी आवाहन केले होते. तरीही प्रेक्षक ऐकायला तयार नव्‍हते. त्‍यामुळे मालिकेतील पाचवा सामना प्रेक्षकांच्‍या अनुपस्थितीत खेळला गेला होता. हा सामना भारत 46 धावांनी हरला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिनला धावबाद हा निर्णय देताच स्‍टेडियममध्‍ये उसळलेली दंगल...सामन्‍यादरम्‍यानची रोमहर्षक छाया‍चित्रे..