आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Arrives In Rohtak For Ranji Match

अखेर सचिन तेंडुलकरसह मुंबई संघ रोहतकमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या तोंडावर मुंबई आणि हरियाणा यांच्यातील लाहिली (रोहतक) येथील रणजी सामन्याला अतिमहत्त्व प्राप्त झाले आहे.

सचिनची छायाचित्रे व मुलाखती घेण्यासाठी आलेल्या प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मुंबई रणजी संघाची आतुरतेने वाट पाहिली. मुंबई संघ सकाळी 10 च्या सुमारास विमानाने निघाला खरा; पण सायंकाळी अंधारून आले तरी रोहतकला पोहोचला नव्हता.

मुंबई ते दिल्ली अंतर मुंबई संघाने विमानाने पार केले. दुपारी दिल्लीहून हा संघ बसने निघाला. दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर द्रुतगती मार्गावरील बस वाहतुकीचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.