आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GOSSIP : तर झाली असती सचिनची धुलाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्टर ब्लास्टर सचिनने जगातील प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली आहे. पण, एक असे ठीकाण आहे जिथे सचिन स्वत: मार खाण्यापासून घाबरतो. अशा या भितीचे ट्विट केले आहे.
नुकताच सचिन सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि 'चेस ऑलिंपियाड फॉर द ब्लाइंड' येथे सामील होण्यासाठी चेन्नईला गेला होता.
तिथे त्याची भेट दिग्गज खेळाडू चारूदत्ता जाधव यांच्याशी झाली. चेस खेळातील या खेळाडूला भेटल्यानंतर सचिन फार खुश झाला. सचिन म्हणाला की, अंध खेळाडूंसाठी खास चेस ऑलिपियाड पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. मी यात सहभागी होणार्‍या भारतीय संघाला भेटलो. त्याचवेळी माझी भेट चारूदत्ता जाधव यांच्याशी झाली त्यांनीच ही स्पर्धा भारतात आणली.
सचिन म्हणाला, मी त्यांच्या सोबत एक मॅच खेळलो, खेळ सुरू झाला आणि आम्हाला पत्रकार परिषदेला जावे लागल्याने मी वाचलो नाही तर, माझी धुलाईच झाली असती.