आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Fail To Achieve Test Cricket Top Records

24 वर्षांच्‍या करिअरमध्‍ये सचिन बनला सर्वांत महान, पण बनवू शकला नाही हे 9 किर्तीमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरूवातीला क्रिकेटमध्‍ये खळबळ, मग स्‍टार आणि आता खेळाचा देव. सचिन तेंडुलकरच्‍या क्रिकेट करिअरची जर तीन युगांत विभागणी केली तर हेच तीन टप्‍पे समोर येतात. शालेय क्रिकेटमध्‍ये त्‍याने विश्‍वविक्रम बनवला होता. तेव्‍हा लोक त्‍याला वंडरबॉय नावाने ओळखू लागले. मग रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफीच्‍या पदार्पणीय सामन्‍यातच सचिनने शतके ठोकून भारतीय क्रिकेटमध्‍ये खळबळ उडवून दिली.

क्रिकेटचा मास्‍टर बनून निवृत्त होणा-या सचिनने आपल्‍या 24 वर्षांच्‍या दीर्घ करिअरमध्‍ये अनेक कमाल केले आहेत. मग तो वनडे सामना असो किंवा कसोटी. दोन्‍ही ठिकाणी त्‍याच्‍या बॅटने कमाल केली. टी-20 बद्दल बोलायचे म्‍हटल्‍यास आयपीएल टीम मुंबई इंडियन्‍सकडून तो सर्वात जास्‍त धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे.


सचिनने कसोटीमध्‍ये सर्वात जास्‍त धावा, शतके आणि अर्धशतके ठोकली आहेत. वनडेमध्‍येही त्‍याच्‍यापेक्षा जास्‍त धावा, शतके आणि अर्धशतके दुसरा फलंदाज करू शकलेला नाही. जेव्‍हा सर्वात कमी डावांमध्‍ये 12 हजार आणि 13 हजार धावांचा विषय निघतो. तेव्‍हा सचिनने रिकी पॉटिंग, जॅक कॅलिस आणि ब्रायन लारासारख्‍या दिग्‍गजांनाही मागे टाकले. क्रीडा इतिहासात 14 आणि 15 हजार धावा बनवण्‍याचा कारनामा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. असे अनेक विक्रम सचिनच्‍या नावे आहेत.

जर एक माणूस विक्रमाचे इमले एकाचवेळी रचत असेल तर त्‍याला सामान्‍य माणूस म्‍हणता येणार नाही. त्‍याला महामानवच म्‍हटले पाहिजे. फॅन्‍स भलेही सचिनला खेळाचा देव म्‍हणत असले तरी कसोटीमध्‍ये असे अनेक विक्रम आहेत. जे सचिनला मोडता आलेले नाहीत. वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या अखेरच्‍या सामन्‍यात तो यातील काही विक्रमांना गवसणी घालू शकतो. परंतु, काही विक्रम मोडता न आल्‍यामुळे त्‍याला ते कायम बोचत राहतील.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, कसोटी इतिहासातील असे काही विक्रम जे क्रिकेटचा देव सचिनलाही मोडता नाही आले...