आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमधून पाहा, किती प्रेमळ आहेत अर्जुन आणि साराचे \'बाबा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअमवर करिअरमधील 200वा आणि अखेरची कसोटी खेळत आहे. स्‍टेडिअम पूर्णपणे सचिनमय झाले आहे. सगळीकडेच फक्‍त 'सचिन...सचिन!' हाच नारा सुरू आहे.

वयाच्‍या अवघ्‍या 16व्‍या वर्षापासून सचिन राष्‍ट्रीय संघात खेळत आहे. आपल्‍या 24 वर्षांच्‍या क्रिकेट प्रवासात त्‍याने इतके विक्रम आपल्‍या नावे केले आहेत, की ते मोजणेही कठीण आहे. सर्वाधिक धावा ते 100 आंतरराष्‍ट्रीय शतकांचा कारनामाही त्‍याने केला आहे.

या दीर्घ प्रवासात त्‍याने मानसन्‍मान आणि पैसा तर अफाट कमावला. पण त्‍याचबरोबर त्‍याच्‍यावरील अपेक्षांचे ओझेही भलतेच वाढले. ज्‍या मुलाने 20व्‍या वर्षातच 5 कसोटी शतके ठोकण्‍याचा कारनामा केला, त्‍याच्‍याकडून प्रत्‍येक सामन्‍यात शतकांचीच अपेक्षा केली जावू लागली. जखमी झाल्‍यानंतरही तो मैदानात शड्डू ठोकून उभा राहिला आणि चाहत्‍यांच्‍या अपेक्षा पूर्ण केल्‍या. जेव्‍हा सचिन 100व्‍या शतकाच्‍या उंबरठयावर होता. तेव्‍हा हा विक्रम करण्‍यासाठी त्‍याच्‍यावर असा दबाव बनवण्‍यात आला. या दबावामुळे त्‍याला शतकही लवकर पूर्ण करता आले नाही. शेवटी बांगलादेशविरोधात शतक ठोकून दबावाचे ओझे त्‍याने खाली केले.

सचिनच्‍या प्रत्‍येक टेन्‍शनच्‍या इलाजामागे एक चेहरा कायम होता. सारा आणि अर्जुन त्‍याचे जीव की प्राण आहेत. पंरतु, एका बापासाठी त्‍याची मुलगीच खास असते. सचिनच्‍या शेवटच्‍या कसोटीची सुरूवातही बालदिनी होत आहे. त्‍यानिमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सचिनने मुलांबरोबर व्‍यतीत केलेले काही संस्‍मरणीय क्षण. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा प्रेमळ मुलांबरोबरील सचिनचे खास क्षण...