आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Farewell Match Latest News Photos

सगळीकडे सचिनच सचिन...पाच दिवस लकी टी शर्ट घालणार आमिर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची अखरेची कसोटी त्‍याच्‍या घरच्‍या म्‍हणजे वानखेडे स्‍टेडिअमवर सुरू आहे. या सामन्‍याबरोबरच सचिनच्‍या 24 वर्षांच्‍या आंतरराष्‍ट्रीय करिअरला ब्रेक लागणार आहे. सचिनच्‍या अखेरच्‍या मालिकेतील पहिल्‍या कसोटीत टीम इंडियाने डावाने विजय मिळवला होता. आता मुंबईमध्‍येही हीच परंपरा कायम राखून आपल्‍या हिरोला शानदार निरोप देण्‍याची प्रयत्‍न टीम इंडिया करणार आहे.

सचिनची शेवटची कसोटी पाहण्‍यासाठी मैदानावर पहिल्‍यांदाच त्‍याची आई रजनी तेंडुलकरही स्‍टेडिअमवर आल्‍या आहेत. सचिनला देशभरातून कोट्यवधी चाहते हा क्षण आपापल्‍या पद्धतीने साजरा करीत आहे. मुंबई कसोटीदरम्‍यान कॉमेंट्री बॉक्‍समध्‍ये आमिर खान सचिनसाठी आपला लकी टी- शर्ट घालून आला आहे. आमिर हा टी शर्ट पाच दिवस घालणार आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनची अखेरची कसोटी संस्‍मरणीय करण्‍यासाठी काय काय करण्‍यात येत आहे...