आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Football Team Latest News In Marathi

मास्‍टर ब्‍लास्‍टर, भारतरत्‍न सचिन तेंडूलकर होणार फुटबॉल संघाचा मालक ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्‍न सचिन रमेश तेंडूलकर आणि सौरव गांगुली आता इंडियन सुपर लीग मध्‍ये बोली लावणार असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सचिन तेंडूलकर हैदराबाद च्‍या पीवीपी वेंचर्स सोबत हैदराबाद संघावर बोली लावणार आहे. तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली कोलकाता संघासाठी उद्योजक हर्ष निओतियांना सोबत घेवून बोली लावणार आहे.

संघ खरेदीसाठी 10 वर्षांचा करार असणार असून बोली लावण्‍यासाठी 120 कोटी रुपयांपासून सुरवात होणार आहे. बोली लावण्‍याची अंतीम तारीख 27 मार्च आहे. त्‍यानंतर एप्रिलच्‍या दुस-या आठवड्यात विजेत्‍यांची नावे जाहीर केल्‍या जातील.

संघखरेदीसाठी रणबीर कपूर, अभिषेक बच्‍चन, जॉन अब्राहम, आणि शा‍हरूख खान बोली लावणार आहेत. नऊ संघांसाठी लिलाव केल्‍या जाणार आहे. त्‍यामध्‍ये बंगळुरु, चेन्‍नई, दिल्‍ली, गोवा, गुवाहाटी, कोच्‍ची, कोलकाता, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.