आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Has Always Been On The Winning Side Of His Final Match Of His Career

सर्व प्रकारच्‍या क्रिकेटमध्‍ये सचिनची विजयी निवृत्ती... क्वचितच नशीबाला येतात असे क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या आंतरराष्‍ट्रीय कारकिर्दीला अखेर पूर्णविराम लागला. वानखेडेच्‍या मैदानावर हजारो चाहत्‍यांच्‍या उपस्थितीत सचिनने क्रिकेटला अलविदा केला. सचिन म्‍हणजे भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट म्‍हणजे सचिन, हे समीकरण गेल्‍या अनेक वर्षांमध्‍ये झाले होते. तब्‍बल 24 वर्षे तो कोट्यवधी चाहत्‍यांच्‍या अपेक्षा खांद्यावर घेऊन खेळला. त्‍याने या चाहत्‍यांना निराश केले नाही. सचिनच्‍या कारकिर्दीवर नजर टाकल्‍यास तो किती महान आहे, का त्‍याला एवढा सन्‍मान मिळला आणि का लाखो चाहत्‍यांच्‍या डोळ्यात अश्रू तराळले याचे उत्तर आपोआपच मिळेल. आज जो भारतीय संघ खेळत आहे, त्‍यातील प्रत्‍येकाने सचिनलाच डोळ्यासमोर ठेवून क्रिकेट खेळले आहे. अशा या सचिनची निवृत्तीही खास ठरली.

सचिनची निवृत्ती विजयानेच व्‍हावी, ही क्रिकेटच्‍या देवासाठी देवानेच रचलेली लीला असावी. कसोटीमध्‍ये निवृत्ती घेताना सचिनचा संघ जिंकला. प्रत्‍येक प्रकारच्‍या क्रिकेटमधून निवृत्ती घेताना तो कायम विजयी संघाच्‍याच बाजूने राहिला आहे. असे निवृत्तीचे क्षण फार कमी खेळाडुंच्‍या वाट्याला आले आहेत.

क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर आणि जाणून घ्‍या सचिनची विजयी निवृत्ती....